वाहतूक पोलिसांची हफ्तेखोरी? अनेक वाहतूक पोलिसांना अनेक वर्षे एकाच ठिकाणी ड्युटी

वाहतूक पोलिसांची हफ्तेखोरी? अनेक वाहतूक पोलिसांना अनेक वर्षे एकाच ठिकाणी ड्युटी

विरार : वाहतूक पोलीस प्रशासनातील काही अधिकारी रिक्षाचालकांकडून महिन्याला ठराविक हफ्ते घेत असल्याने नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यांविरोधातील कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका वाहतूक पोलिसाने रिक्षा थांब्यांवर जाऊन ‘मला ठराविक रक्कम द्या, नाही तर मला नाईलाजास्तव कारवाई करावी लागेल,` अशी धमकी दिल्यानंतर वाहतूक पोलीस प्रशासनातील भ्रष्टाचाराला वाचा फुटली आहे.   

या भ्रष्टाचाराचे परिणाम म्हणून रेल्वे स्थानकांसह शहरातील प्रमुख मार्गांवर नियमित रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांपेक्षा अनधिकृतरीत्या वाहतूक करणाऱ्यांचे प्रमाण अधिक वाढले असल्याचे निरीक्षण आहे. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीही वाढलेली आहे. याबाबत तक्रारी असतानाही ठोस कारवाई होत नसल्याने वाहतूक पोलिसांच्या हफ्ता वसुलीवर शिक्कामोर्तब झाले आहे. किंबहुना; वाहतूक पोलिसांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आवाज उठवला तर निवडक कारवाई केली जाते, असा आरोप स्थानिक नागरिक आणि वाहतूक तज्ज्ञांनी केला आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई न करणारे वाहतूक पोललीसच याला जबाबदार असल्याचे परखड मतही त्यांनी व्यक्त केलेले आहे. 

वाहतूक पोलिसांवर वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी आहे. मात्र अनेक वर्षे एकाच ठिकाणी ड्युटी लावून भ्रष्टाचारास खतपाणी घालण्याचे प्रकार  वाहतूक पोलीस प्रशासनाकडून सुरू आहेत. पोलिसांनी कर्तव्याशी प्रामाणिक राहण्याची गरज आहे. वाहतूक नियम तोडणाऱ्या रिक्षाचालकांना पोलीसच अभय देत असतील, तर हे प्रशासनाचे अपयश आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे विरार शहर सरचिटणीस आणि ऑटोरिक्षा चालक मालक महासंघाचे अध्यक्ष  महेश अंबाजी कदम यांनी दिली आहे. 

वसई-विरारमधील वाहतूक कोंडी रोखायची असेल, तर नागरिकांनी बेशिस्त रिक्षाचालकांना थारा देऊ नये. तसेच प्रशासनाने वाहतूक पोलिसांच्या कर्तव्यात सातत्याने बदल करावा आणि गैरप्रकारांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. बेशिस्त ऑटोरिक्षाचालक वाहतूक पोलिसांवर वरचढ ठरत असल्याचे दिसत आहे. वाहतूक नियमांचे पालन करण्याऐवजी नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांकडूनच अभय मिळत असल्याचे नागरिकांचे निरीक्षण आहे. याचे परिणाम म्हणून शहरात दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची मनमानी सुरू आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow