शनिवारी वसईत समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम!

शनिवारी वसईत समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम!

विरार : शनिवार २१ सप्टेंबर २०२४ रोजी जागतिक किनारपट्टी स्वच्छता दिनाचे औचित्य साधून वसई-विरार शहर महानगरपालिकेने राजोडी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीमेचे (बीच क्लिनअप ड्राईव्ह) आयोजन केले आहे. या उपक्रमात १० हजारांहून अधिक नागरीक आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यावेळी 'गो शून्य' या संस्थेमार्फत लाईव्ह प्लास्टिक रिसायकलद्वारे संकलित झालेल्या प्लास्टिकपासून त्याच जागी वापराजोग्या विविध वस्तू बनविल्या जाणार आहेत.

भरती ओहोटीमुळे किनाऱ्यांवरील कचरा समुद्रात जातो, ज्यामुळे सागरी परिसंस्था
असुरक्षित होते. यामुळे जलप्रदूषण वाढते. अस्वच्छ किनारे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या आरोग्यसाठी धोकादायक असतात. हे टाळण्यासाठी किनाऱ्यांची सफाई होणे गरजेचे असते. दरवर्षी २१ सप्टेंबर हा दिवस जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. 
वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे या दिवसाचे औचित्य साधून हा किनारपट्टी स्वच्छता मोहीम अर्थात बीच क्लिनअप ड्राईव्ह उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात वसई विरार आणि आसपासच्या परिसरातील शाळांतील वि‌द्यार्थी-शिक्षक, महावि‌द्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील
(एनएसएस) वि‌द्यार्थी, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, पर्यावरण कार्यकर्ते, स्वयंसेवक आदी १० हजारांहून अधिक जण सहभागी होणार आहेत, अशी माहिती वसई विरार महापालिकेचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी दिली.

या मोहिमेत, समुद्रकिनाऱ्यावर जमा केलेल्या प्लास्टिक कचऱ्यापासून त्याच जागी प्रत्यक्ष 'गो शून्य या संस्थेतर्फे लाईव्ह प्लास्टिक रिसायकलद्वारे प्लास्टिक कचऱ्यापासून वस्तू तयार होणार आहेत. या यंत्रातील विविध मोल्डद्वारे कुंड्या, ग्लास, कप, किचेन, कानातले आदी वस्तू बनविल्या जाणार आहेत, ही माहिती गो शून्य संस्थेचे संस्थापक गोपाल रायठठ्ठा यांनी दिली.

किनारपट्टी स्वच्छता मोहीमेतून स्वच्छता, कचऱ्याचे विलगीकरण, रिसायकल, पुनर्वापर, प्लास्टीकचा कमीत कमी वापर आदी संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वसई विरार शहराला विस्तीर्ण असा निसर्गरम्य समुद्र‌किनारा लाभला आहे. या समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य अबाधित ठेवून, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी ही मोहिम महापालिकेमार्फत राबविण्यात येत आहे. तरी, नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow