शिरगाव :  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगाव येथे शिरगाव किल्ला स्वच्छता मोहिमेचे भव्य आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, आणि शिरगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ८:०० वाजता करण्यात आले होते.

कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. मनोज रानडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. रवींद्र शिंदे, गटविकास अधिकारी मा. श्री. राहुल काळभोर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रकल्प अधिकारी श्री. अतुल पारसकर, विस्तार अधिकारी श्री. जाधव, सरपंच श्री. घनश्याम मोरे, ग्रामविकास अधिकारी श्री. मंगेश पाटील, माजी सरपंच श्री. सुजित पाटील, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ग्रामविकास अधिकारी श्री. मंगेश पाटील यांच्या प्रस्तावनेने झाली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. मनोज रानडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वच्छतेचे महत्त्व आणि समाजात जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची भूमिका अधोरेखित केली. गटविकास अधिकारी मा. श्री. राहुल काळभोर यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.

यानंतर परिसरातील विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, महिला बचत गटाच्या सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने शिरगाव किल्ल्याच्या परिसरात व आतील भागात स्वच्छता करण्यात आली. अवघ्या दोन तासांतच मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करून किल्ला परिसर स्वच्छ करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. रानडे यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करत सर्व सहभागींचे मनःपूर्वक आभार मानले.