देशाच्या संरक्षणमंत्र्यांकडून चुकीचा उल्लेख म्हणाले - "डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मोदी सरकारने भारतरत्न दिला

देशाच्या संरक्षणमंत्र्यांकडून चुकीचा उल्लेख म्हणाले - "डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मोदी सरकारने भारतरत्न दिला

वसई- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची कॉंग्रेस पक्षाने उपेक्षा केली. डॉ आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार मोदी सरकारने दिला असे धक्कादायक वक्तव्य केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वसई येथे केले. वसई विधानसभेतील महायुतीच्या उमेदवार स्नेहा दुबे-पंडित यांची जाहीर प्रचार सभा शनिवारी संध्याकाळी वसईच्या दिवाणमान येथील मैदानात संपन्न झाली. यावेळी आपल्या भाषणात केंद्रीय संरक्षण मंत्री यांनी कॉंग्रेस पक्षावर हल्लाबोल केला. सध्या काँग्रेसने आणि महाविकास आघाडीने संविधान वाचवा असा नारा देत मतदारांना आवाहन केले आहे. इतकंच नाही तर राहुल गांधी यांच्यासह अनेक काँग्रेसचे नेते आपल्या सोबत संविधानाची प्रत घेऊन फिरत असतात. याच संविधानाच्या मुद्द्याला धरून राजनाथ सिंह बोलत होते मात्र काँग्रेसवर आरोप करण्याच्या भरात त्यांनी मोदींनी बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिल्याचे सांगितले आहे. 

ते म्हणाले की, " इतके वर्षे काँग्रेसचे सरकार होते, काँग्रेस बाबासाहेबांना भारतरत्न उपाधी देऊ शकत होते, भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करू शकत होते. मात्र काँग्रेसने हे केले नाही. पहिल्यांदा हे कुणी केल आहे तर आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे. बाबासाहेबांना १९९० साली काँग्रेस सरकारच्या काळातच 'भारतरत्न' बाबासाहेबांना ३१ मार्च १९९० ला मरणोत्तर भारतरत्न जाहीर करण्यात आला होता. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर सामाजिक समतेसाठी केलेल्या संघर्षाची दखल घेत त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी भारतरत्न देण्यात आला होता. तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्या सरकारनं हा पुरस्कार देण्याचं ३१ मार्च १९९० घोषित केलं. १४ एप्रिल १९९० रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती आर. वेंकटरमन यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी सविता आंबेडकर यांनी भारतरत्न पुरस्कार स्वीकारला. असे असून सुद्धा राजनाथ सिंह यांनी जाहीर सभेत चुकीची माहिती दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow