केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; पगारात 'इतकी' वाढ होण्याची शक्यता!

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 8 व्या वेतन आयोगासंदर्भातील चर्चांना आता गती मिळाली आहे. यामध्ये फिटमेंट फॅक्टर हे पगार आणि पेन्शनच्या निर्णयाचा मुख्य आधार बनले आहे. विशेषतः या फिटमेंट फॅक्टरवर जोरदार चर्चा होऊ लागली आहे. नॅशनल काऊन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव मशिनरीचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी नुकतेच फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी केली होती. त्यांचा असा दावा आहे की, वाढती महागाई पाहता या बदलाची आवश्यकता आहे.
फिटमेंट फॅक्टर काय आहे ?
फिटमेंट फॅक्टर एक गुणांक असतो, जो पगार आणि पेन्शनच्या संशोधनासाठी वापरला जातो. सातव्या वेतन आयोगाने 2.57 चा फिटमेंट फॅक्टर ठेवण्याचा सल्ला दिला होता, ज्यामुळे किमान पगार 7,000 रुपयांनी वाढून 17,990 रुपये झाला होता. आठव्या वेतन आयोगाने यावरील सुधारणा करत 2.86 चा फिटमेंट फॅक्टर ठेवण्याची शिफारस केली आहे. जर हे लागू झाले, तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान पगार 51,451 रुपयांपर्यंत वाढू शकतो.
पगारात किती वाढ होऊ शकते?
आठव्या वेतन आयोगामध्ये 2.86 चा फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा सध्याचा किमान पगार 17,990 रुपयांपासून 51,451 रुपयांपर्यंत वाढू शकतो. वाढती महागाई आणि जीवनाच्या खर्चाच्या दृष्टीने ही वाढ महत्त्वपूर्ण ठरू शकते. तथापि, काही अफवा पसरल्या होत्या की किमान वेतन 34,000 ते 35,000 रुपये होऊ शकते, पण शिव गोपाल मिश्रा यांनी या माहितीचे खंडन केले आहे आणि याला कोणताही अधिकृत आधार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय सरकारकडून आठव्या वेतन आयोगासंदर्भातील अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली गेलेली नाही. 2026 मध्ये यासाठी समितीची स्थापना होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहेत. वाढती महागाई आणि जीवनाच्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर, सरकार वेळेत आणि योग्य निर्णय घेईल, अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे.
What's Your Reaction?






