मीरा रोड : ऑनलाइन फसवणूक झालेली साडेतीन लाख रक्कम परत करण्यात सायबर पोलिसांना यश

मीरा रोड : ऑनलाइन फसवणूक झालेली साडेतीन लाख रक्कम परत करण्यात सायबर पोलिसांना यश

मीरा रोड - मीरा रोड मध्ये राहणाऱ्या व्यक्तीने  शेअर मार्केटिंग मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून साडेतीन लाखांची फसवणूक केली होती ही फसवणूक केलेली रक्कम सायबर पोलिसांनी तपास करून तक्रारदार यांना परत मिळवून दिली आहे. 

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील मिरा-रोड पोलीस ठाणे हद्दीत राहणारे तक्रारदार सुंदर यांनी ऑनलाइन शेअर ट्रेडिंग करून आर्थिक रक्कम मिळत असल्याने ऑनलाईन शेअर ट्रेडिंग ॲपवर रकमेची गुंतवणूक केली परंतु तक्रारदार  यांना कोणताही परतावा मिळाला नाही.  त्यामुळे तक्रारदार यांनी आर्थिक फसवणूक झाल्याने सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार दिली होती तसेच ऑनलाईन एनसीसीआरपी पोर्टलवर तक्रार नोंदवण्यात आली ऑनलाइन पोर्टलवर तक्रार नोंदवल्याने फसवणुकीची वर्ग झालेली रक्कम संशयित बँक खात्यात थांबवण्यात आली. थांबवण्यात आलेली रक्कम परत मिळवण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज सादर करण्याबाबत तक्रारदार यांना सूचना देण्यात आल्या.  तक्रारदार यांनी त्यांची फसवणुकीची रक्कम परत मिळवण्यासाठी न्यायालयात याचिका सादर केली त्याबाबत सायबर पोलीस ठाणे यांनी न्यायालयामध्ये सविस्तर अहवाल सादर करून न्यायालयाचे आदेश प्राप्त केले आहेत. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow