विरार : बेवारस वाहनांचा २९ जुलै रोजी लिलाव!

विरार : बेवारस वाहनांचा २९ जुलै रोजी लिलाव!

विरार: उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बेवारस अवस्थेत सापडलेल्या वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. या लिलावामध्ये बजाज ॲव्हेंजर (MH01BC 7567) मोटरसायकल, करिझ्मा (MH03BF 1555) आणि लाल रंगाची हिरो ॲक्टिवा (MH04 FM 5382) या वाहनांचा समावेश आहे.

या वाहनांच्या मालकांची माहिती शोधण्याचा प्रयत्न तसेच आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त – भाईंदर विभाग यांच्याकडून लिलावासाठी परवानगी घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्रत्यक्ष वाहनांची पाहणी करून मूल्यांकन करण्यात आले आहे.

त्यानुसार, सदर वाहनांचा लिलाव २९ जुलै २०२५ रोजी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात सरकारी नियमांनुसार करण्यात येणार आहे. या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी २९ जुलै २०२५ पूर्वी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी नाईक यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow