विरारमध्ये मीरा-भाईंदर पोलीसांकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

पालघर जुलै २०२५: मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या ट्रॅफिक शाखेच्या वतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पश्चिम येथील ट्रॅफिक शाखा कार्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाचा उद्देश पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि त्यांचे कल्याण सुनिश्चित करणे हा होता. केअरवेल डायग्नोस्टिक संस्थेच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिराचा एकूण ५५ पोलीस अधिकारी व कर्मचारी लाभार्थी ठरले. यामध्ये ट्रॅफिक शाखा, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-०३) कार्यालय, भरोसा सेल आणि पोलीस सहाय्यक आयुक्त (विरार विभाग) यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.
शिबिरामध्ये केअरवेल डायग्नोस्टिकचे वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. शुभम दुबे (मुख्य सल्लागार), डॉ. नितेश पांडे (मुख्य सल्लागार) आणि डॉ. राहुल कासबे (डोळे तज्ज्ञ) यांनी उपस्थितांना आरोग्य तपासणी व सल्ला दिला.
या यशस्वी उपक्रमाचे नेतृत्व पोलीस सहाय्यक आयुक्त (ट्रॅफिक) श्री. शंकर इंदलकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश शेट्ये (ट्रॅफिक कंट्रोल शाखा, विरार) यांनी केले.
शिबिराच्या अंमलबजावणीत पोलीस उपनिरीक्षक संदीप यादव, SAFO प्रशांत म्हात्रे, पोलीस हवालदार धिरज बावळे व निलेश बधे, तसेच सुरक्षा रक्षक राजन यादव आणि तुकाराम कुंभार यांनी सक्रिय सहभाग घेतला.
हा उपक्रम पोलीस दलातील आरोग्य सजगतेचा एक उत्तम नमुना ठरला आहे.
What's Your Reaction?






