सहाय्यक आयुक्त मोहन संख्ये यांचा धडाका! नालासोपारा-धानीव येथील कारवाईत 17 हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

सहाय्यक आयुक्त मोहन संख्ये यांचा धडाका! नालासोपारा-धानीव येथील कारवाईत 17  हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त
सहाय्यक आयुक्त मोहन संख्ये यांचा धडाका! नालासोपारा-धानीव येथील कारवाईत 17  हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

विरार : वसई-विरार महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या वतीने मंगळवार, 7 जानेवारी रोजी सकाळी  नालासोपारा-धानीव परिसरात निष्कासन मोहीम हाती घेण्यात आली. सहाय्यक आयुक्त मोहन संख्ये यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या कारवाईत अंदाजित 17  हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. ही कारवाई प्रामुख्याने नवजीवन रोड व धानिवबाग नाका येथे करण्यात आली. 

धानिव, शानबार समोर, नवजीवन रोड येथील कारवाई 14 हजार 500 चौरस फुटांचे 10 अनधिकृत औद्योगिक गाळे निष्कासित करण्यात आले. तर धानिवबाग नाका येथे अंदाजित तीन हजार चौरस फुटांचे 04 अनधिकृत गाळे जमीनदोस्त करण्यात आले. सदर मोहीम आयुक्त अनिलकुमार पवार, अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे साहेब यांच्या आदेशाने तर उपायुक्त दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.  या मोहिमेत कनिष्ठ अभियंता भाविक नाईक, मनीष पाटील, विवेक गुतुकडे व प्रभाग समितीचे कर्मचारी सहभागी झाले होते. 

वसई-विरार महापालिका प्रभाग समिती ‘जी` व ‘एफ` हे प्रभाग अनधिकृत बांधकामांसाठी कुप्रसिद्ध आहेत. खान कम्पाउंड, उमर कम्पाऊंड, मायकल कम्पाऊंड, रिचार्ड कम्पाउंड, आयशा कम्पाउंड, संतोष भुवन अशा नवीन अनधिकृत वसाहती या प्रभागांत वसल्या आहेत. या अनधिकृत बांधकामांचा ताण वसईतील अन्य भागांच्या सोयीसुविधांवर पडत आहे. शिवाय यातून गुन्हेगारीलाही उत्तेजन मिळत असल्याने व वसई-विरार महापालिकेचा कर मोठ्या प्रमाणात बुडत असल्याने ही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होत होती. परंतु भूमाफियांसोबतच्या आर्थिक हितसंबंधांमुळे या बांधकामांवर कारवाई करण्यात पालिका अधिकाऱ्यांना मर्यादा येत होत्या. मात्र सहाय्यक आयुक्त मोहन संख्ये यांनी या मर्यादा ओलांडत भूमाफियांचा सुपडा साफ केला आहे. 

मुळातच निर्भिड व कामाप्रति निष्ठा जपणाऱ्या मोहन संख्ये यांनी भूमफियांच्या राजकीय संबंधांना चूड लावण्याची हिंमत दाखवली आहे. हजारो चौरस फुटांची अनधिकृत बांधकामे निष्कासित करून भूमफियांसाठी पुन्हा एकदा ते कर्दनकाळ ठरले आहेत. मागील काही महिन्यांतील सातत्यपूर्ण मोहिमांतून मोहन संख्ये यांनी आपली प्रतिभा दाखवलेली आहे. त्याआधी विशेष नियोजन प्राधिकरणाचे सहाय्यक आयुक्तपदी असताना मुंबई-अहमदाबाद महामार्गात व पूरस्थितीला अडथळा ठरणाऱ्या शेकडो छोट्या-मोठ्या टपऱ्या व अनधिकृत बांधकामांविरोधात त्यांनी बेधडक कारवाई केलेली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow