नगर भूमापनाचा वीज पुरवठा दुसऱ्यांना खंडित:विज पुरवठ्या मागे तहसील कर्मचारीही सामील ?

नगर भूमापनाचा वीज पुरवठा दुसऱ्यांना खंडित:विज पुरवठ्या मागे तहसील कर्मचारीही सामील ?

वसई : वसई तहसीलदार कार्यालयामधील नगर भूमापन कार्यालयाचा वीजपुरवठा अखेर महावितरण मार्फत दुसऱ्यांदा खंडित करण्यात आला. 

अधिक माहितीनुसार वसई तहसीलदार कार्यालयातील वीज मीटर मधून बेकायदेशीर रित्या नगर भूमापन कार्यालयाने वीज पुरवठा घेतला होता याबाबत तहसीलदार कार्यालयाने सदर विभागास लेखी पत्र देऊन सदरचे कार्यालय स्थलांतर करण्यासाठी आदेश दिले होते तसेच बेकायदेशीरपणे घेतलेला वीज पुरवठा तात्काळ खंडित करण्याचे निर्देश दिले होते असे असतानाही, या दोन्ही आदेशांचे भंग करून सदर कार्यालय सुरू होते. 

तहसीलदार कार्यालयामध्ये तहसीलदार संवर्गाची तीन पदे कार्यरत आहेत. त्यांनाच बसण्याकरता जागा शिल्लक राहिलेली नाही. भूमी अभिलेख हे स्वतंत्र कार्यालय असून त्यांना त्यांची जागा आहे असे असतानाही या कार्यालयाचा नगर भूमापन विभाग तहसीलदार कार्यालयामध्ये मागील काही वर्षांपासून ठाण मांडून आहे. 

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या बेकायदेशीर वीज पुरवठ्यासाठी तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्यास मासिक दोन हजार रुपये दिले जात असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. 

तहसीलदार कार्यालयाचे थकीत वीज बिल सध्या चर्चेचा विषय ठरलेला असून, त्यातच नगर भूमापनाच्या अशा गैरकृत्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे सदर वीज खंडित करण्यासाठी पत्रकार अमर म्हात्रे यांनी लेखी मागणी केली होती. 

सर्वसामान्य वीज ग्राहकास अशा स्वरूपाचा वीजपुरवठा दिल्यास त्याच्यावर फौजदारी कारवाई होते त्यामुळे नियमाला बगल देऊन सुरू असलेली प्रक्रिया तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्या निदर्शनास आणल्यानंतर याबाबतचे आदेश निर्देश करण्यात आले होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow