वसईत पुन्हा हिट अँड रन - चिमुकल्याच्या अंगावर कार घालत आरोपी फरार
वसईत हिट अँड रन प्रकरणात वाढ होत असून वसई पूर्वेच्या वालिव येथे एक चिमुकला खेळत असताना त्याच्या अंगावरून कार घातल्याची घटना घडली आहे. सध्या मुलाला रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

वसई - वसई पूर्वेच्या वालिव परिसरात शिव भिम नगर, नाईकपाडा येथे लहान चिमुकला खेळत असताना त्याच्या अंगावरुन कार घातल्याचा प्रकार समोर आला आहे. कार चिमुकल्याच्या अंगावर गेल्याचे कळताच कारचा चालक फरार झाला आहे. त्यामुळे परिसरात संतापजनक वातावरण आहे. चिमुकल्याचे नाव राघवकुमार चव्हाण उर्फ छोटू (५) असून तो खेळत असताना ही घटना घडली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, वसई पूर्वेच्या शिव भिम नगर, नाईकपाडा, वालिव येथे आज (दि. 25) सकाळी 10.21 वाजता मोकळ्या जागेत एम.एच. 01 ई एम 3245 या क्रमांकाची कार एका प्रवाशाने ओला ॲपवरुन बुक करुन मागवली होती. प्रवासी कारमध्ये बसल्यानंतर कारचालक बेदराकपणे कार चालवली यातच समोर खेळत असलेल्या चिमुकल्या मुलाच्या अंगावरून कारण गेली. मुलाच्या अंगावरून कार गेल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपी फरार झाला. तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो तिथून निघून गेला.
सध्या मुलाला वालीवच्या वालवादेवी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्या हाताला, डोक्याला, छातीला दुखापत झाली असून, त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.
"मी स्वतः रुग्णालयात जाऊन जखमी झालेल्या मुलाची परिस्थिती पहिली. आम्ही त्याचा जबाब नोंदवला असून, तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. कारचालकाने आपला मोबाईल बंद केला आहे पण आमच्या कडे त्या कार मध्ये प्रवास केलेल्या प्रवाशाचा संपर्क क्रमांक आहे. आम्ही त्याचाही जबाब नोंदवून घेतला आहे." - दिलीप घुगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालिव पोलीस ठाणे
What's Your Reaction?






