वसई ,नालासोपरात पिवळे वादळ धडकणार

वसई ,नालासोपरात पिवळे वादळ धडकणार

विरार: विधान सभेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास ही सुरुवात झाली आहे.उद्या (28 ऑक्टोबर)ला वसई आणि नालासोपारा मध्ये पिवळे वादळ धडकणार असून,मोठ्या शक्ती प्रदर्शनात वसई मधून हितेंद्र ठाकूर आणि नालासोपरामधून क्षितिज ठाकूर हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत

वसई तालुक्यातील नालासोपारा आणि वसई या मतदार संघातून उद्या हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर हे मोठ्या शक्ती प्रदर्शनात आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत
यावेळी बहुजन बिकास आघाडीचे माजी महापौर,उपमहापौर,स्थायी समिती सभापती ,प्रभाग समिती सभापती आणि पंचायत समिती सभापती,माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत वसई नध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळी 9 वाजता चिमाजी आप्पा मैदानातून रॅली निघणार आहे तर नालासोपारा मधून क्षितिज ठाकूर यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नालासोपारा बहुजन विकास आघाडी भवन येथून रॅली निघणार असून मोठ्या शक्ती प्रदर्शनात दोन्ही ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणार असल्याने वसई तालुक्यात उद्या पिवळे वादळ येणार असल्याचे बोलले जात आहे

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow