मुंबई:शासन नेहमीच मराठी चित्रपटसृष्टीच्या पाठीशी ठामपणे उभे असून मराठी चित्रपटसृष्टीने आता जागतिक झेप घ्यावी, असे प्रतिपादन सुधीर मुनगंटीवार यांनी केले. दर्जेदार मराठी चित्रपटांना अनुदान वाटपाच्या कार्यक्रमात सह्याद्री अतिथीगृहात ते बोलत होते.
यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, मुंबई कोल्हापूर प्रमाणे लवकरच नागपूर मध्ये सुद्धा 150 एकर जागेमध्ये फिल्म सिटी तयार करणार असून मराठी चित्रपट निर्मात्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध परवानग्यासाठी एक खिडकी योजनेची अंमलबजावणी करणार आहे तसेच राज्यात 75 नवीन चित्रनाट्य गृहे बनविण्यात येणार आहेत. तसेच नरिमन पाँईट येथे मराठी चित्रपट गृह उभारण्यात येणार असल्याचेही सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळामार्फत दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसाहाय्य योजनेतर्गत आयोजित केलेला धनादेश वितरण कार्यक्रमात मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. दादासाहेव फाळके चित्रनगरी (filmcity) च्या 47 वर्धापन दिनाचा मुहूर्त साधून या चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळाने आजच्या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन केले. अ, ब आणि क या तीन श्रेणीत मोडणाऱ्या दर्जेदार चित्रपटाना हे अर्थसहाय्य देण्यात आले. या कार्यक्रमात अपर मुख्य सचिव विकास खारगे,महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक धनंजय सावळकर यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री.मुनगंटीवार पुढे म्हणाले की, निर्मात्यांना जिथे चित्रीकरण करायचंय तिथे त्यांना निशुल्क चित्रीकरण करता येणार आहे. उत्तम चित्रपट तयार करण्यासाठी निर्मात्यांनी खूप मेहेनत घेतलेली असते पण कधी यश मिळते तर कधी अपयशाला सामोरे जावे लागते, मात्र त्यामुळे खचून जायचे नसते.
दादासाहेब फाळके यांनी चित्रपट सृष्टीची सुरुवात केली. दादा कोंडके या साध्या माणसाचे सगळे चित्रपट रौप्य महोत्सवी ठरले. तर रजनीकांत या मराठी अभिनेत्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर दक्षिणेत सर्वांची मने जिंकली. त्यांचा आदर्श मराठी चित्रपटसृष्टीने समोर ठेवावा, असेही ते म्हणाले.
दर्जेदार चित्रपट निर्मात्यांना शासनामार्फत आर्थिक पाठबळ मिळावं यासाठी हा प्रयत्न आहे. हा फक्त धनादेश नाही तर महाराष्ट्राच्या साडे तेरा कोटी जनतेच्या या शुभेच्छा आहेत. माझी अशी अपेक्षा आहे की मराठी चित्रपटसृष्टीने अजून प्रगती करावी. जसे दक्षिणात्य भाषेचे चित्रपट हा मराठी मध्ये डबिंग करून दाखवले जातात तसे भविष्यात मराठी चित्रपट दक्षिणात्य व अन्य भाषेमध्ये डबिंग करून दाखवला गेले पाहिजेत. इतकेच नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टीने सातासमुद्रापार जात जागतिक झेप घ्यावी अशी सर्व मराठी जनतेची अपेक्षा आहे. कारण भारतीय चित्रपटसृष्टीचा संस्थापकच मराठी होता आणि भारतीय चित्रपट सृष्टीची मुहुर्तमेठ या महाराष्ट्रातच रोवली गेली होती. म्हणूनच मराठी चित्रपट सृष्टीच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे असेही मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले.
यावेळी अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी सध्या सर्वच क्षेत्रात एआयचा वापर वाढला आहे, याकडे लक्ष वेधले. चित्रपट सृष्टीपुढे एयआयचे मोठे आव्हान आहे. मात्र एयआयच्या माध्यमातूनच मराठी चित्रपटसृष्टीने संपूर्ण देशात आणि देशाबाहेर जावे, असे ते म्हणाले. जीडीपीमध्ये मनोरंजन क्षेत्राचा ३% वाटा आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
यावेळी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त तसेच अ दर्जा प्राप्त असलेल्या महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांना पाच लाख रुपये धनादेशचे वितरण करण्यात आले. तिचं शहर होणे या चित्रपटासाठी रसिका आगाशे, येरे येरे पावसासाठी शफक खान, बटरफ्लाय साठी मीरा वेलणकर, गिरकी या चित्रपटासाठी कविता दातीर यासह राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त वाळवी चित्रपटाला दुप्पट अनुदान देण्यात आले. या कार्यक्रमात 77 अ व ब वर्ग दर्जाच्या व तसेच प्रथमच समावेश केलेल्या क वर्गाच्या 21 चित्रपट निर्मात्यांना 29 कोटी 22 लाख रुपयांचे धनादेश वितरण करण्यात आले.
मराठी चित्रपटसृष्टीने जागतिक झेप घ्यावी : मुनगंटीवार
अखेर दहा वर्षांनी होणार महात्मा गांधींच्या अर्धपुत...
भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयाच्या आवारात राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अर्धपुतळा बसवण्याचा दहा वर्षांपूर्वी ११ जानेवारी २०१६ रोजी माजी विरोधी पक्षनेते आसिफ ...
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई पोलीसांकडून 'निर्भया पथ...
मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी त्यांच्या निर्भया पथकातील शूर आणि समर्पित महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...
भायंदर : अन्न विषबाधेची भीषण घटना — ३ वर्षांच्या म...
भायंदर : भायंदर पश्चिम येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत केवळ ३ वर्षां...
मीरा-भाईंदरमध्ये डेंग्यूचा कहर, १० जणांचा संशयित म...
मीरा-भाईंदर:मीरा-भाईंदर शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याने आरोग्य धोक्यात आ...
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्ग...
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगाव येथे शिरगाव किल्ला ...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०...
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी व्यापक कारवाई करत तब्बल ७८,०४...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्...
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, याचाच भाग म्ह...
वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म ६ व ७ ची दक्षिण बाज...
वसई, २९ ऑगस्ट : पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, वसई रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ ...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
कल्याणमधील इमारतीच्या १५व्या मजल्यावर भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही
कल्याण:मंगळवार संध्याकाळी ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरातील एका उंच नि...
मिरारोडच्या लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये गोंधळ, नातेवाईकाने वॉचमनला मारली कानाखाली, स्टाफने केली तोडफोड
मिरारोड: रविवारी रात्री मिरारोडच्या लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये एका किरकोळ ...
नालासोपारा : अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या रिक्षाचालकास अटक; ६ किलो गांजा जप्त
नालासोपारा - नालासोपारा पूर्व येथे अवैधरित्या अमली पदार्थ बाळगणाऱ्या व...
माझे घर, माझा गणपती’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेची शाडू मूर्ती कार्यशाळा; नागरिक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे, ३० जुलै: ठाणे महानगरपालिका आणि प...
Stay Connected
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्गत भव्य स्वच्छता अभियान राबवले
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनां...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०४६ चौ. फूट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने १...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्यक आयुक्त गणेश पाटील निलंबित
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठ...
Previous
Article