वसई-विरार महापालिकेचा इशारा: व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

विरार : स्थानिक संस्था करअंतर्गत नोंदणीकृत आस्थापनाधारकांचे कर मूल्यनिर्धारण झालेले नाही; अशा सर्व व्यापाऱ्यांनी त्यांचे कर मूल्यनिर्धारण पूर्ण करून घेण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून मागविण्यात आलेल्या कागदत्रांची पूर्तता संबंधित स्थानिक कर विभाग कार्यालयाकडे त्वरित करावी; अशा सूचना वसई-विरार महापालिकेने केली आहे. कर मूल्यनिर्धारण कार्यवाहीस प्रतिसाद न देणाऱ्या व्यापाऱ्यांच्या बाबतीत नियमावलीतील तरतुदींचे योग्य निर्णय शक्तीनुसार यशाशक्ती कर मूल्यनिर्धारण कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे. अशा व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात व्याज व शास्तीसहित दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा वसई-विरार महापालिकेने दिला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार 30 एप्रिल 2025 पासून स्थानिक संस्था कर विभाग कायमचा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशा सूचना वसई-विरार महापालिका हद्दीतील स्थानिक संस्था कर (एलबीटी) मूल्यनिर्धारण प्रलंबित असलेल्या आस्थापना धारकांना देण्यात आलेल्या आहेत.
त्याअनुषंगाने; स्थानिक संस्था करअंतर्गत नोंदणीकृत आस्थापनाधारकांचे अद्याप कर मूल्यनिर्धारण झालेले नाही; अशा सर्व व्यापाऱ्यांनी कर मूल्यनिर्धारण पूर्ण करून घेण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून मागविण्यात आलेल्या कागदपत्रांची पूर्तता संबंधित स्थानिक संस्था कर विभाग कार्यालयाकडे त्वरित करावी, असे महापालिकेने कळविलेले आहे.
कर मूल्यनिर्धारण कार्यवाहीस प्रतिसाद न देणाऱ्या व्यापाऱ्यांच्या बाबतीत नियमावलीतील तरतुदींचे योग्य निर्णय शक्तीनुसार यशाशक्ती कर मूल्यनिर्धारण कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे. अशा व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात व्याज व शास्तीसह दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे
What's Your Reaction?






